‘तिथेच उद्धव ठाकरे चुकले’; अजित पवार स्पष्टच बोलले
मुंबई | शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा दिल्यानं ठाकरे सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र यावर प्रतिक्रिया देताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेनेमध्ये जी फूट पडली ती फूट पडण्यापूर्वीच या सर्व गोष्टींची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती, असं अजित पवारांनी सांगितलंय.
स्वत: पवारसाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर या सर्व गोष्टी घातल्या होत्या. पण पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तिथेच खरी गफलत झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंना सावध केलं होतं. मी स्वत: याबाबत उद्धव ठाकरे यांना सावध केलं होतं, असं अजित पवारांनी सांगितलं.
हा आमचा पक्षांतर्गत मामला आहे. मी बोलेल एकनाथ शिंदे यांच्याशी असं उत्तर त्यांनी दिलं, आणि शेवटी जे नको व्हायला हवं होतं तेच झालं. शिवसेनेमध्ये फूट पडल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.