बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इतक्या मतांनी निवडून द्या की, मी म्हणणाऱ्यांची बोबडी वळायला पाहिजे”

पुणे | राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे वचर्स्व असलेला सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवारांनी नाराज उमेदवारांना टोले लगावले आहेत.

सोमेश्वर साखर कारखान्याला माझं उसाचं काडकं येत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज मला करायचं आहे. त्यामुळे सोमेश्वर विकास पॅनेच्या उमेदवारांना इतक्या मतांनी निवडून द्या की मी म्हणाऱ्यांची बोबडी वळायला पाहिजे. हे सर्व महाराष्ट्राला पाहू द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

भविष्यात सोमेश्वरचे साखर युनिट, डिस्टिलरी आणि सह वीजनिर्मिती प्रकल्प वाढवयाचे आहेत. त्यामुळे कुणीही गाफिल राहू नका, क्रॉस मतदान करू नका. 152 गावांमधून 21 जण निवडायचे आहेत. त्यामुळे साहजिकच उमेदवारांमध्ये नाराजी असणार. परंतु सगळ्यांना विविध संस्थांवर संधी दिली जाईल. सुकुमार खोमणे सारख्यांनीही समजून घेतलं, परंतु नंदकुमार जगतापांना बाजार समितीला सभापती केलं परंतु तरीही पण बैलपोळ्याला बैल झाले, हे चांगलं नाही, असंही टोला अजित पवार लगावला आहे.

दरम्यान, कारखान्याचा कर वाढवला आणि आरोग्य केंद्र दिलं. विकास कामांना निधी दिला. मी काय कमी केलं. असं सांगतानाच एकीकडे जेवायला बोलवतात आणि काळे झेंडे लावता. स्वार्थासाठी लोकांना भडकावलं जात आहे, हेही लोकांनी ध्यानात घेतलं पाहिजे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 थोडक्यात बातम्या-

“इतिहास साक्षी आहे, दडपशाही विरोधात सह्याद्री निधड्या छातीने उभा राहिला”

…म्हणून वाढदिवसादिवशी महानायकाने घेतला ‘या’ जाहिरातीतून बाहेर पडण्याचा निर्णय

तालिबान्यांसाठी धोक्याची घंटा! ‘तात्काळ ‘हा’ परिसर खाली करा’; अमेरिकेचा नागरिकांना इशारा

भाजपला मोठा धक्का! ‘या’ विद्यमान मंत्र्याने केला काॅंग्रेसमध्ये प्रवेश

फक्त 6 रुपये घेऊन मुंबईत आला, मात्र त्यानंतर ‘मिस्टर बजाज’ने गाजवली बाॅलिवूड इंडस्ट्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More