Ajit Pawar l विधानसभा निवडणूक तोंडावर येताच राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशातच सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांसाठीही योजना सुरु केली आहे. मात्र आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजून एक गुड न्यूज आहे.
शेतीचं वीजबिल भरावं लागणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार :
आज दिंडोरी येथे जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचं वीजबिल भरावं लागणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. एवढंच नव्हे तर आतापर्यंत थकबाकी असलेले वीज बिल देखील भरण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारच्या वतीने राबलेल्या सौरपंप योजनेमुळे यापुढे शेतकऱ्यांना वीजेसाठी अवलंबून राहावे लागणार नाही. तसीच सौरउर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौरपंपाचा वापर करता येणार आहे आणि शेतीला पाणी देता येणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
Ajit Pawar l कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर अजितदादांच नाव सांगा :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, दिंडोरी येथे जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या भावांनाही साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता शेतीसाठी वापरलेल्या वीजेच बील भरावे लागणार नाही.
कारण राज्य सरकारने सौरपंपाची योजना सुरु केली आहे. त्यामुळे थकबाकी असलेले शेतीसाठी वापरलेल्या विजेचे बिल भरण्याची गरज नाही. तसेच जर कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला सांगा अजितदादाने सांगितलंय असं सांगा असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. यामुळे लाडक्या बहिणींसोबतच लाडके भाऊ देखील खुश होणार असल्याचं चित्र दिसत आहे.
News Title : Ajit Pawar Statement Do not pay farm electricity bill
महत्त्वाच्या बातम्या-
आज नीरज चोप्रा खेळणार फायनल सामना; कुठे, किती वाजता पाहता येणार सामना?
राज्यात पावसाचा ब्रेक! ‘या’ जिल्ह्यांत मात्र धो-धो बरसणार, यलो अलर्ट जारी
बाजारात आलाय सर्वात बेस्ट स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का!
उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?, थेट दिल्लीतून मोठी बातमी