अजित पवारांच्या प्रकृतीत बिघाड, डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

Ajit Pawar | विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून त्यामुळे राज्यात राजकीय पक्षाचे नेते तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून जनसन्मान यात्रा करत असताना दिसत आहेत. शिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमांना देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अजित दादा हजेरी लावत आहे. अजित दादांना एका आजाराची लागण झाली असून डाॅक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले डाॅक्टर?

अजित दादा (Ajit Pawar) गेल्या काही दिवसांपासून जनस्मान यात्रा करण्यात व्यस्थ असताना त्यांना एका आजाराची लागण झाल्याचं समोर आलं आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री अजित दादा (Ajit Pawar) उपस्थित राहू शकणार नाहीत.

ब्रॉन्कायटीसचा काय त्रास होतो?

ब्राॅन्कायटीस हा एक असा आजार आहे ज्यामुळे व्यक्तीच्या श्वसननलिकेत सूज येते. आपल्या फुप्फुसातून हवा आत आणि बाहेर केली जाते. दरम्यान यावेळी त्या श्वसननलिका फुगल्याने श्वास घेण्यास त्रास होतो आणि श्वास घेण्यात अडचणी येतात. यावेळी व्यक्तीला खोकला लागतो. तसेच अधिक प्रमाणात कफ होतो. एवढंच नाही तर श्वसनलिका कमजोर होउन फुफ्फुसं देखील अति प्रमाणात खराब होतात.

विश्रांतीचा सल्ला-

गेल्या काही दिवसांपासून अजित दादा (Ajit Pawar) जनस्नमान यात्रा करत आहे. त्यावेळेस त्यांना हा त्रास होत आहे. दरम्यान, आता डाॅक्टरांनी त्यांना विश्रांती देण्याचा सल्ला दिला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते लगेचच पुन्हा दौरे सुरु करतील.

News Title : ajit pawar suffers from bronchitis

महत्त्वाच्या बातम्या-

गरोदर महिलांनो या महिन्यात आहे चंद्रग्रहण; जाणून घ्या वेळ आणि तारीख

लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत वाद?; शिवसेना नेते दादांवर भडकले

शिक्षक दिनानिमित्त आपल्या गुरूंना द्या खास शुभेच्छा; शिक्षक होतील खूश

भाद्रपद महिन्यात नशिब फळफळणार, या ‘5’ राशीवाल्यांचं भाग्य उजळणार!

रुपाली चाकणकरांसाठी गुडन्यूज?, अजित पवार घेणार मोठा निर्णय