Ajit Pawar-Suresh Dhas | बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या अटकेत आहेत. तर, एक आरोपी अजूनही फरार आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड हा अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. यामुळे धनंजय मुंडे देखील अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. (Ajit Pawar-Suresh Dhas)
भाजपा आमदार सुरेश धस यांनी तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. धस रोज नव-नवीन खुलासे करत आहेत. अशात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. सुरेश धस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी बंगल्यावर गेले होते.
आमदार सुरेश धस-अजित पवार भेट
भाजप आमदार सुरेश धस यांच्यासोबत आमदार रत्नाकर गुट्टे सुद्धा होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर या तिघांची बैठक झाली. सुरेश धस अचानक अजित पवार यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. इतके दिवस ते धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करत होते, अशात त्यांनी अचानक अजित पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Ajit Pawar-Suresh Dhas)
या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याबाबत चर्चा झाल्याचीही माहिती आहे. तसेच बीडच्या परिस्थितीबाबतही धस यांनी अजित पवारांशी चर्चा केली. त्यातच भाजपासह विरोधी पक्षाने देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आमदार सुरेश धस हे रोज पत्रकार परिषदा घेऊन धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहेत. धनंजय मुंडे यांची त्यांनी राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार?
अशात ते अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक झाली आहे. वाल्मिक कराड या हत्येचा मुख्य मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जातोय.
वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये असून त्याची कसून चौकशी केली जातेय. त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे सरपंच हत्या प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा देखील संबंध जोडला जातोय. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सातत्याने केली जातेय. (Ajit Pawar-Suresh Dhas)
News Title – Ajit Pawar-Suresh Dhas meeting
महत्त्वाच्या बातम्या –
‘तारक मेहता..’ फेम ‘या’ अभिनेत्याची तब्येत अत्यंत खराब; फोटो पाहून चाहत्यांना धक्का
साऊथ सुपरस्टारचा दुबईत भीषण अपघात, अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल
आज तूळ, कुंभसह ‘या’ राशींना होणार धनलाभ; अश्विनी नक्षत्रात भाग्य उजळणार
संतोष देशमुख यांच्या मारहाणीच्या व्हिडीओमधून धक्कादायक माहिती समोर!