मुंबई | औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.
राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत एसओपी तयार करुन लागू करण्यात येईल. तसेच ही एसओपी राज्यातील सर्व कोव्हिड सेंटर्ससाठी बंधनकारक असेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणं हे देखील वाईट कृत्य आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती अजित पवारांनी यावेळी बोलताना दिली आहे. तसेच आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, औरंगाबादच्या पदमपुरा कोव्हिड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या जागी तुमची किंवा माझी बहीण असती तर?’; जळगाव वसतीगृहातील घटनेवरून मुनगंटीवार संतापले
‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश
“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”
…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले
“मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झालं”; ‘ग्लोबल फ्रिडम’चा अहवाल
Comments are closed.