नांदेड महाराष्ट्र

भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत, चंद्रकांत पाटील हे तर बावचळलेत- अजित पवार

नांदेड | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बावचळल्यासारखे बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.

महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.

सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येतात. पण थोडे मागे-पुढे करुन निर्णय घ्यावे लागतात. राज्याचे हित हेच आमचे समान धोरण आहे. आजवर महाराष्ट्र कधी दिल्लीश्वरांपुढे झुकला नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.

भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, यासाठी सरकार पडेल असं गाजर दाखवण्याचं काम सुरु आहे. तरीदेखील एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले, असं अजित पवार म्हणाले,

महत्वाच्या बातम्या-

“विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न”

आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या- चंद्रकांत पाटील

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामींना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापलं!

‘कंगणाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने’; उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं

स्मिथ आणि फिंचची दमदार शतकं; ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 375 धावांचं खडतर आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या