बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांचा पुणेकरांना अल्टीमेटम; लॉकडाऊनसंदर्भात केलं मोठं वक्तव्य

पुणे | राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. विशेषत: पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी परिस्थिती गंभीर होत चालली असून ती सुधारली नाही तर कठोर निर्णय घेणार, असा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला आहे.

मी सर्वांशी चर्चा केलीय, जनतेला मला सांगायचं आहे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल. जनतेच्या मनात भीती राहिली नाही, असं अजित पवार म्हणाले.

पुण्यातील शाळा-कॉलेज हे 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याआधी 31 मार्चपर्यंत शाळा कॉलेज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पुण्यातील उद्यान केवळ सकाळी उघडी राहणार आहेत. त्याशिवाय मॉल आणि थिएटर 50 टक्के संख्येने सुरु राहणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

युपीएच्या नेतृत्वाबाबत संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले…

सरकारने जबरदस्तीने घरी बसवलं म्हणत IPS अधिकाऱ्याने केलं असं काही की…

“प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक कोटी रूपये, हेलीकाॅप्टर देणार आणि चंद्रावरही नेणार”

“भारतात 30 टक्के मुस्लीम एकत्र आले तर चार पाकिस्तान तयार होतील”

” भाजपमध्ये दलितांना किंमत नाही, राष्ट्रपतींनी नमस्कार केला तर मोदी त्यांची दखल घेत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More