बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राच्या लॉकडाऊनबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनबद्दल महत्वाचं वक्तव्य केलं आहे. लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितलं जाईल, जेणेकरून कोणी अडकून राहणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही पण लावावेच लागले तर दोन दिवस आधी सांगितले जाईल, जेणेकरून कोणी अडकून राहणार नाही. पुण्यात ज्या पद्धतीने निर्बंध लागू करण्यात आले आहे तसेच निर्बंध सर्वत्र लागू करण्याची अनेकांची मागणी आहे. त्याबाबत उद्या सोमवारी 8 वाजता निर्णय होईल, असं अजित पवार म्हणालेत.

आताची लाट वेगळी आहे, घरात एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होत आहे. ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहे, असं अजित पवार म्हणालेत.

पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. पंढरपूरमध्ये केंद्र सरकारने निवडणूक लावलेली आहे. त्यामुळे ते क्षेत्र अपवाद आहे. केरळ, बंगालमध्ये ही निवडणुका आहेत तर तिथे निर्बंध का नाहीत असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत, पण नियम पाळून प्रचार करावा, अशी सूचना अजित पवारांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात इतक्या रुग्णांची नोंद

“टीव्ही चॅनलवाल्यांनी पश्चिम बंगाल तामिळनाडूतील गर्दीचे शॉट महाराष्ट्रात दाखवत बसू नये”

नशिबाचा खेळ! बाॅल स्टंप्सला लागला तरीही बाद झाला नाही क्विंटन डिकाॅक, पाहा व्हिडीओ

कोरोनाची परिस्थिती भयंकर, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस

वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More