पुणे | राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळतीये. यापैकी पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतीये. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत अजित पवारांनी वाढत्या रुग्णसंख्येबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
रुग्णसंख्या अवाक्याबाहेर गेली तर अजित पवारांना फोन केला तरीही बेड मिळायचे नाहीत, त्या वेळी काय करणार?, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी सुद्धा लॉकडाउनच्या विरोधात आहे, पण सध्या संख्या ज्या पद्धतीने वाढते आहे ते पाहता 100 टक्के हॉस्पिटल ताब्यात घेतली तरीही बेड मिळणार नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
लोकं ऐकंतच नाहीत, कडक निर्बंध घातले तरीही…एखाद्या घरात रुग्ण आढळले तरीही त्या घरातली लोकं गावभर फिरतात. काही उपयोग होत नाही. असंच सुरू राहिलं तर रुग्णसंख्या अवाक्याबाहेर जाईल आणि उद्या मला फोन केला तरीही बेड मिळणार नाही, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय. पुणे शहरात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीये.
थोडक्यात बातम्या-
“फक्त सल्ले देण्याचे उद्योग नका करू, 50 डॉक्टर्स पण द्या”
कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही करु नका; WHOनं दिला महत्त्वाचा इशारा
नाव न घेता उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना झापलं!
‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत’; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; जाणुन घ्या एका क्लिकवर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.