पुणे | 25 वर्षावरील ज्यांना सहव्याधी आहेत अशा नागरिकांनाही कोरोना लस उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी लवकरच राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ते बारामतीमध्ये बोलत होते.
कोव्हिड लस कोणाला द्यायची, हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकार घेत असतं. 1 एप्रिल पासून 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तरी 45 वर्षाखालील ज्यांना डायबिटीजसारख्या अन्य व्याधी आहेत, त्यांना कोरोना लस देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी यापूर्वी केली होती.
दरम्यान, राज्यात कोरोनाने हाहा:कार उडवला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, कोरोनाला आटोक्यात आणणं शक्य होत नाहीये.
थोडक्यात बातम्या-
“अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री तर उद्धव ठाकरे हे विश्वासघाताने मुख्यमंत्री झाले”
‘सामना’तून सरकारवरच टीकेचे बाण; वाचा ‘रोखठोक’मधील 10 धक्कादायक मुद्दे
राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन नेत्यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
वकील असलेल्या पत्नीनेच केली पतीची हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.