मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन साजरी करुया, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करुन त्यांनाही दिवाळी आनंदात सहभागी करुन घेण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मास्क लावणं, गर्दी टाळणं, वारंवार हात धुत रहाणं, यासारखी दक्षता घेऊन प्रत्येकानं स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला सुरक्षित ठेवण्यात योगदान द्यावं. दिवाळी सणाच्या काळात कोरोना आणि प्रदूषण वाढणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
आपलं राज्य सध्या कोरोना संकटाशी लढत आहे. ही लढाई लवकर जिंकायची असेल तर सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारने केलेल्या घोटाळ्या विरोधात, किरीट सोमय्या उच्च न्यायालयात मागणार दाद
पत्र लिहिण्यास कारण की….शरद पवारांचं आईला भावनिक पत्र
संजय राऊत, त्रागा करु नका; सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या
भाषा सांभाळून वापरा नाहीतर उलटे फटके पडतील; अनिल परब यांना भाजपचं प्रत्युत्तर
“नितीश कुमार दगाफटका करतात, बिहारमध्ये राजकीय भूकंप केव्हाही होऊ शकतो”