Top News

कोरोनाबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर…- अजित पवार

Photo Credit- Facebook/ Ajit Pawar

मुंबई | कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र डिसेंबर महिन्यानंतर राज्यात पहिल्यांदाच रविवारी एका दिवसात कोरोनाचे नवीन चार हजार रुग्ण आढळून आले.

रविवारी भारतात 11 हजार 431 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर 9 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  सोमवारी देखील या आकड्यांमध्ये कमालीची वाढ झाली असल्याचं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. अजित पवारांनी स्वत: यासदंर्भात माहिती दिली आहे.

जर कोरोनाबाधितांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, नागरिकांनीही त्यासाठी तयार रहावं, असे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.

जनतेतून कोरोनाचे भय संपत आहे, जरी कोरोनाची लस बाजारात आली असली तरी याचा अर्थ कोरोनावर आपण विजय मिळवला असा होत नाही, असं अजित पवारांनी म्हटलंय.

दरम्यान, राज्यातील आणि मुंबईतील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

हे तर महागायब सरकार!; चित्रा वाघ यांनी सांगितलं कोण कोण झालंय गायब

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं स्वागत

“कारखान्याला फुकट पैसा आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं”

“उद्योगपती मित्रांसाठी मोदींनी देशाची संपत्ती विकायला काढली”

शरद पवारांच्या आदेशानंतर ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या