मुंबई | राजकीय जीवनात सर्वोच्च पद प्राप्त करणं ही मनीषा प्रत्येकाचीच असते. त्यामुळेच मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहात आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
जयंत पाटलांनी जी काही इच्छा प्रदर्शित केली आहे त्याला मी पाठिंबा देतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटू शकतं. मलाही तसं वाटणं स्वाभाविक आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
थोडक्यात बातम्या-
प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही- उर्मिला मातोंडकर
“राजकीय हवा बदलली आहे, भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात”
दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतचे ‘हे’ स्वप्न पूर्ण करणार
होते शरद पवार म्हणून मुंबईत लँड झालं टीम इंडियाचं विमान, अन्यथा…