मुंबई | अधिवेशनात वीज कनेक्शन तोडल्याप्रकरणी भाजपने आक्रम भूमिका मांडल्यामुळे अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आहे. वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
प्रश्न उत्तराच्या तासात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडणीच्या मुद्दा उपस्थितीत केलाय.
लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल आहे. एकाच वेळी एवढी मोठी रक्कम भरणे सर्वसामान्यांना शक्य नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा देण्याचे आश्वासन दिलं होतं पण नंतर त्यांनी माघार घेतली. या मुद्दावर चर्चा झाली पाहिजे किंवा तात्काळ वीज कनेक्शन तोडकाम थांबवलं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर वीज कनेक्शन तोडण्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे, ती थांबवण्यात येणार आहे. जोपर्यंत वीज बिलाच्या मुद्यावर सभागृहात चर्चा होणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, वाढीव वीजबिल आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाजपने विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केलं होतं.
थोडक्यात बातम्या-
सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला
पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांना घातल्या गोळ्या; हाथरसमधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाला बलात्कार प्रकरणात अटक
“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”
ते सगळ्यात मोठे गुंड; भर भाषणात हर्षवर्धन जाधवांच्या मैत्रिणीनं केलेल्या आरोपांनी खळबळ
Comments are closed.