महाराष्ट्र मुंबई

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल- अजित पवार

Photo Credit- Ajit Pawar Twitter

मुंबई | शेतीपंपासाठी निम्मे वीजबिल भरण्याची योजना सुरु केली आहे. त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपली वीजबिले अदा करावीत. अन्यथा महावितरण कंपनी आणि पर्यायाने शेतकरीही अडचणीत येतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय.

माळेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिल्या.

आम्ही शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाचे निम्मे वीजबिल भरण्याची योजना सुरु केली आहे. महावितरण कंपनीला तब्बल 40 हजार कोटी रुपये येणे आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी तातडीने निम्मे वीजबिल भरुन शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असं अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांनी वीजबिल भरलं नाहीतर महावितरण कंपनीला नाईलाजास्तव वीजजोड तोडावा लागेल, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे”

“शरद पवारांसारखे अनुभवी नेते चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत”

RBIची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना रद्द

माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो- तात्याराव लहाने

केंद्राची मोठी घोषणा, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या