बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळं सर्व क्षेत्रांना हानी पोहोचली आहे. आता कुठं परिस्थिती पुर्वपदावर येत आहे असं वाटायला लागलं की लगेच ओमिक्राॅननं (Omicron) सर्वांना काळजीत टाकलं आहे. जगभर ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या परिस्थितीकडं सर्व सभागृहाचं लक्ष वेधणारं वक्तव्य केलं आहे.

सभागृहात राज्यातील दोन, तीन, चार, पाच लाख लोकांचं नेतृत्व करणारे सभासद बसले आहेत. या सर्वांना जगात काय परिस्थिती आहे याची कल्पना असायला हवी. जगभर ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. अमेरिका, इंग्लडमध्ये ओमिक्राॅननं थैमान घातलं आहे. परिणामी सभागृहातील सभासदांनी कृपया मास्क परिधान करावेत, अशी विनंती अजित पवार यांनी सभागृहाला केली आहे.

वरीष्ठ पातळीवर आणि केंद्र सरकारच्या पातळीवर रात्री लाॅकडाऊन लावण्याबाबत विचार करण्यात आला. काही ठराविक सदस्य सोडले तर कोणी इथं मास्क लावत नाही. महाराष्ट्रातील सर्व जनता या सभागृहात काय चाललंय हे पहात आहेत. आपल्या देशात महाराष्ट्रात रूग्ण वाढायला वेळ लागणार नाही. परिणामी आपण सर्वांनी काळजी घ्यावी, असं पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांनी ओमिक्राॅनबाबत सभागृहात जगात चाललेली खरी परिस्थिती मांडली आहे. इंग्लंडमध्ये ओमिक्राॅननं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. परिणामी आपल्याकडं काळजी घेण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या 

नितेश राणेंना मोठा धक्का; ‘या’ प्रकरणी चौकशी होणार

“अजित पवारांकडून एकदा चूक झाली, तुम्ही सारखं सारखं बोलणार का?”

हिवाळी अधिवेशन: आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘पवार साहेबांमुळे शिवसेनेने भाजपला योग्य जागा दाखवली’; रूपाली ठोंबरेंचा घणाघात

“…तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More