बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल- अजित पवार

पुणे | लोकांनी सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव मागच्यावेळी लावला तसा कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात कोरोनाच्या जिल्हा प्रशासनासोबतच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

मागच्यावेळी लॉकडाऊन होतं तेव्हा बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यावेळी आपण खूप मोठा काळ थांबलो. मात्र दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा कोरोना बाधितांची संख्या वाढलीय. त्यामुळे कठोर वाटतील असे निर्णय घेण्याची वेळ आली. म्हणूनच नागरिकांना सहकार्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन अजित पवारांनी केलंय.

माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सांगितलंय की दोन दिवसांचा लॉकडाऊन पाळला नाही तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन आणावा लागेल, तशी वेळ येऊ नये अशी विनंती आहे, असं अजित पवार म्हणाले.

आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे हे म्हणणं चूक. तसं काहीही घडलेलं नाही. आरोग्य यंत्रणा मागील वर्षभरापेक्षा अधिक काळ जीवाचं रान करतेय. पोलीस राबतायेत, डॉक्टर्स राबतायेत. नव्याने पुण्यात 900 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

थोडक्यात बातम्या- 

“BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका”

सावधान! कोरोना हवेतून पसरतोय; परिस्थिती आणखी गंभीर होणार

उस्मानाबादेत एकाच वेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारी दृश्य

भारतासाठी धोक्याचा इशारा, दररोज होऊ शकतो 2320 जणांचा मृत्यू

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महाराष्ट्र सरकार करणार मेगाभरती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More