बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारलं, त्याची भरपाई राज्य सरकार करुन देणार”

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील कायदेतज्ञांच्या जोडीने नवीन तज्ञ वकिलांची फौज आपण न्यायालयात उभी केली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणं धक्कादायक आहे, असं अजित पवार म्हणाले.

मराठा बांधवांच्या प्रदीर्घ, संयमी, ऐतिहासिक संघर्षाला सर्वोच्च न्यायालयात यश मिळेल, अशी आमची खात्री होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून राज्य सरकार आपली पुढील भूमिका निश्चित करेल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जे नाकारले, त्याची भरपाई शक्य त्या सर्व मार्गांनी करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील, असं अजित पवारांनी म्हटलं.

मराठा बांधवांना न्याय आणि त्यांचा हक्क देण्यासाठी राज्य सरकारला जे शक्य आहे ते सर्व केलं जाईल. मराठा बांधवांच्या मनातील अन्यायाची भावना दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकार करेल, असंही अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला- अशोक चव्हाण

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ममता बँनर्जी व राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात वाक् युद्ध

मराठा आरक्षणप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला हा महत्त्वाचा सल्ला!

मराठा आरक्षणावरून उद्धव ठाकरेंनी जोडले केंद्र सरकारसमोर हात; केलं ‘हे’ आवाहन

पुण्याला मिळाला लसींचा मोठा साठा; उद्यापासून सुरू होणार 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More