मुंबई | मुंबई महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. मुंबईत आजच्या घडीला राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत. येणाऱ्या काळात असं काम करा की 8 नगरसेवकांचे 60 नगरसेवक झाले पाहिजेत, असे आदेश अजित पवारांनी आज कार्यकर्त्यांना दिले आहेत.
अजित पवार मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
मुंबईमध्ये काम करत असताना येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना मला सांगायचंय की जास्तीत जास्त आमदार निवडून कसे आणता येईल, याकडे लक्ष द्या. मुंबईतमध्ये 30 ते 35 जागा आहेत. त्यामध्ये कमीत कमी 10 आमदार तरी निवडून आले पाहिजेत, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनो मुंबईत आपल्याला राष्ट्रवादीला एवढं मजबूत करायचं की ज्यावेळी मुंबई महानगरापालिकचं जागावाटप होईल त्यावेळी शिवसेनेला आपल्याला बरोबरीच्या जागा मागता येतील, असंही अजित पवार म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
“ठाकरे सरकारच्या फसव्या कर्जमाफीमुळेच ‘त्या’ शेतकऱ्यानं जीवन संपवलं”
आशिष शेलार पुन्हा कृष्णकुंजवर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांची आव्हाडांवर स्तुतिसुमनं, म्हणाले…’आता जवळ आल्यावर कळतंय ते कसे आहेत’
एके काळी दगड खायचो, आता विरोधकांचं डिपाॅझिट जप्त करतो- नितीन गडकरी
…तर त्या शिवसैनिकाचं थोबाड फोडा; विनायक राऊतांची ताकीद
Comments are closed.