महाराष्ट्र मुंबई

“पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार”

मुंबई | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचार-विनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…’; कविता करत रामदास आठवलेंचा सरकारला टोला

…तर मी फासावर जायला तयार; राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांनी ‘त्या’ युवतीचे आरोप फेटाळले!

”नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या”

विरोधी पक्षाला 15-20 वर्षांनी आशीर्वाद मिळावा- सतेज पाटील

“नारायण राणेंना भाजपत कोण विचारतंय?, राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या