पुणे | मी राजकारणात आलो आणि अडकलोय, कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजितदादांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार बोलत होते.
मला खूप जण भेटतात. कोरोनामुळे आमची नोकरी गेल्याचं सांगतात. त्यामुळे मुलांनो करिअर निवडताना विचार करा, आपल्या वडिलांना विचारा, व्यवसाय करता येईल का? प्रशासकीय सेवेत येता येईल का? याचा विचार करावा, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही कधीपर्यंत खुर्चीवर, तर जनतेने सांगितलं तोपर्यंत. जनता म्हटली घरी बसा, की चाललो आम्ही. पण सीईओ बघा… जोपर्यंत रिटायर होत नाही, तोपर्यंत खुर्चीवर असतो. शिवाय प्रमोशन होत जातं. अभिनेता, कला, संगीत, पत्रकारिता अशी वेगवेगळी क्षेत्र निवडू शकता. असं क्षेत्र निवडा ज्यातून आनंद आणि पैसे मिळतील, याचा विचार करा, असं अजित पवारांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
अखेर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
राज्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय
नव्या कृषी कायद्यांचा देशातील 10 कोटी छोटया शेतकऱ्यांना लाभ झाला- रामनाथ कोविंद
प्रजासत्ताक दिनी झालेला तिरंग्याचा अपमान दुर्दैवी- रामनाथ कोविंद
उद्या अजित पवार पेट्रोल पंपात भेसळ करतो अशी बोंब व्हायची, आणि…- अजित पवार