बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणी धरू शकत नाही, त्यांनी देवालाही सोडलं नाही- अजित पवार

पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी पुण्याच्या वारजे भागातील संजीवन उद्यानाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. वारजेच्या वन विभागाच्या जागेत हे वन उद्यान उभं राहणार आहे. आज सकाळी सात वाजता अजित पवार या कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. विषेश म्हणजे ते दहा मिनीटे कार्यक्रमाच्या वेळेआधीच हजर होते.

अजित पवारांनी पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन करताना म्हटलं की, नावं ठेवण्यात पुणेकरांचा कुणीच हात धरू शकत नाही. जिथे कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जुन्या काळी खून, मारामाऱ्या, विचीत्र अपघात होत असायचे. या भागात डुक्करांची संख्या जास्त होती आता पुणेकरांनी या जागेला ‘डुक्करखिंड’ असं नामकरण केलं आहे. त्यांनी या कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, पुणेरी पाट्यांचं कुतूहल कोणाला नाही. त्यामागे पुणेकरांची असलेली कल्पकता. निश्चितच नावं ठेवण्यात पुणेकरांचा कुणीच हात धरू शकणार नाही, मी आपल्या सर्वांना खात्रीने सांगू शकतो. आता तुम्ही म्हणाल कसं काय तर, आपण अनेक शहरात जातो, पण इथं आपल्या पुण्यात काय म्हणतात तर पासोड्या चौक, सोट्या म्हसोबा…नुसता म्हसोबा नाही तर सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर.. उपाशी विठोबा, ताडीवाला दत्त, डुल्या मारूती, जिलब्या मारूती, भिकारदास मारूती…अहो, पुणेकरांनी नावं ठेवताना देवाला पण सोडलं नाही, तिथं माणसांची आणि ठिकाणांची काय कथा, असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांनी महाविकास आघाडी सरकारचं काम दाखवा आणि बक्षिस जिंका असं जाहीर केलं होत. याला प्रत्युत्तर देत अजित पवार यांनी आढावा बैठकीमध्ये आम्ही काय कामं चालू आहेत याचा आढावा घेत राहतो. पुण्यातील विकासकामांना निधी देण्याचं काम करतो. मेट्रोचा हफ्ता थकू नये यासाठी प्रयत्न आम्ही करत असतो, असं सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या – 

नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेने केली ‘ही’ मोठी घोषणा

गोपीचंद पडळकरांनी करुन दाखवलं; पोलिसांना गुंगारा देत अखेर बैलगाडा शर्यत संपन्न

तुमचा माझा पगार हा जनतेच्या घामाच्या पैशातून मिळतो याचं भान ठेवा…- अजित पवार

“आज भागवत कराड यांची मांडव परतनी झाली, पण माझा हनिमून झाला”

डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढवली चिंता; अभ्यासातून धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More