बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ तारखेपर्यंत पुण्यातील शाळा कॉलेज बंद राहणार- अजित पवार

पुणे | पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येबद्दल चर्चा करण्यात आली. याबैठकीत पुण्यातील शाळा कॉलेज 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.

पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पण ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. तसेच जर ही परिस्थिती अशीच राहिली तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल. जनतेच्या मनात भीती राहिली नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.

पुण्यात 50 टक्के बेड्स राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी कार्यक्रम सर्वच पक्षांनी बंद केले पाहिजेत. लग्न किंवा अंत्यसंस्कारावेळी 50 पेक्षा जास्त संख्या नको, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.

पुण्यातील उद्यान केवळ सकाळी उघडी राहणार आहेत. त्याशिवाय मॉल आणि थिएटर 50 टक्के संख्येने सुरु राहणार आहे. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवणार आहे, असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहेे.

थोडक्यात बातम्या- 

UPSC चा सावळा गोंधळ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘त्या’ पत्रामुळे विद्यार्थ्यांना मोठा फटका

अजित पवारांचा पुणेकरांना अल्टीमेटम; लॉकडाऊनसंदर्भात केलं मोठं वक्तव्य

पुण्यात लॉकडाऊन लागणार का?; वाचा अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील सर्व मुद्दे

युपीएच्या नेतृत्वाबाबत संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले…

सरकारने जबरदस्तीने घरी बसवलं म्हणत IPS अधिकाऱ्याने केलं असं काही की…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More