पुणे महाराष्ट्र

“मोदींनी ज्या इमारतीला भेट दिली त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली”

पुणे | सीरम इन्स्टिट्यूच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी भेट दिली. यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्या दिवस उजडताच यासंबंधी तपास सुरू होणार असून आगीचं नेमकं कारण उद्या स्पष्ट होईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या इमारतीला भेट दिली. त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

आग लागल्यानंतर आतील स्प्रिंकल चालू झाले होते, पण आग भडकल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. या आगीत ज्या पाच लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली!

वीज कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी ‘या’ माजी आमदाराला तीन महिन्यांचा कारावास!

“भाजपने अद्यापही सुशांत सिंहच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही”

सायरस पुनावालांची मोठी घोषणा; आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या