पुणे | सकाळी लवकर उठण्याची सवय ही मला आजोंबामुळे नव्हे तर काकांमुळे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांमुळे लागली, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजितदादांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार बोलत होते.
आम्ही जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून आमचे चुलते वयाच्या 27 व्या वर्षांपासून सकाळी सातला कामाला सुरवात करायचे. रात्री कितीही उशिरा आले तरी सकाळी सातला काम सुरु करणार म्हणजे करणार अशी त्यांची पद्धत होती. नुकतेच त्यांनी 80 वर्ष पूर्ण केले. पण आज देखील ते सकाळी सकाळीच कामाला सुरुवात करतात, असं अजित पवारांनी सांगितलं.
तुमच्यावर संस्कार कसे होतात त्यावर हे अवलंबून असतं. सकाळी सकाळी कामाला सुरुवात केली तर वातावरण सुद्धा प्रसन्न व स्वच्छ असतं. तसेच प्रचंड उत्साह पण असतो, असं अजित पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे- देवेंद्र फडणवीस
“मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही”
“…म्हणून बीएमसीतल्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल”
धक्कादायक! गावाला येत नसल्याने पतीने पत्नीची गळा चिरुन केली हत्या
…त्यासाठी राज ठाकरेंना आम्ही नक्की मार्गदर्शन करू- संजय राऊत