महाराष्ट्र मुंबई

“पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आजही काम करत आहेत”

मुंबई | पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आजही काम करत आहेत. या वयात इतकं प्रचंड काम करणारा दुसरा एकही नेता आज देशात नाही हे नाकारता येणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.

माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

राजकीय जीवनात शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 30 वर्षे काम करत आहोत. यामध्ये अनेक लोकांची ओळख होत असते. त्यामध्ये राजीव आवळे यांचं काम मी पहात आलो आहे. ते गरीब व वंचित वर्गासाठी काम करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

जे कुणी भाजपचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांना तिन्ही पक्ष मिळून निवडून आणण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास अजित पवार यांनी दिला.

थोडक्यात बातम्या-

छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही- उदयनराजे भोसले

ऑस्ट्रेलियावरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू संघाबाहेर

क्रूरतेचा कळस! पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार मारलं

‘बर्गरकिंग’चे शेअर्स घेतलेले गुंतवणूकदार तीनच दिवसात बक्कळ मालामाल!

आम्ही आरएसएसच्या हिंदू धर्मावर विश्वास ठेवत नाही- ममता बॅनर्जी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या