बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फोडाफोडीचं राजकारण केलेल्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं थारा दिलेला नाही”

मुंबई | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. खातेवाटपावरून अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

खरंतर आता खूपच लवकर खातेवाटप करायला हवं. 17 तारखेला अधिवेशन सुरू होतंय. आज 13 तारीख आहे. अधिवेशनात प्रश्न विचारले जातात. प्रश्नाला उत्तर त्या विभागाचे मंत्री म्हणून संबंधितांचं नाव येतं. पण आता नेमकं काय कारण आहे, हे त्या दोघांनाच माहिती, असं पवार म्हणालेत.

त्या दोघांचा एक आवडता शब्द झाला आहे, तो म्हणजे ‘लवकरात लवकर’, असा टोलाही अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीसांना लगावला आहे. तसेच फोडाफोडीचं राजकारण केलेल्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं थारा दिलेला नाही, असंही अजित पवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

संजय राऊतांचा असा आहे कोठडीतला दिनक्रम; राऊतांसाठी ‘या’ सुविधा उपलब्ध

BSNL चा धमाका; कंपनीने केली ‘या’ जबरदस्त प्लॅनची घोषणा

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“विदर्भात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आमचा पक्ष मोठा”

‘जे शिवसेनेतून फुटलेत, त्यांना आडवं करू’; चंद्रकांत खैरे आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More