अहमदनगर महाराष्ट्र

….तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता- अजित पवार

Photo Credit- Ajit Pawar Twitter

अहमदनगर | सौरऊर्जा प्रकल्प सूर्यप्रकाशावर चालणारं आहे. मी आधीच सांगतोय, उद्याच्याला ढगाळ वातावरण आलं, पावसाळ्यात वगैरे नाही तापलं तर म्हणाल अजित पवार काय भंगार बोलत होता, तोंड वर करुन. इथं चालना काय..तर ते सूर्य असेल तरच चालणार हे लक्षात ठेवा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला.

उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प आम्ही राबवतोय. गेल्या पाच वर्षात शेतीपंपाची 45 हजार कोटी थकबाकी झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार वीजेच्या बाबतीत काम कसं करणार?, असा सवाल अजित पवारांनी केला.

आपणही आपली वीज बील न भरण्याची मानसिकता बदलायला हवी. आम्ही थकबाकीत 50 टक्के सवलत देणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी बोलताना जाहीर केलं.

थोडक्यात बातम्या-

सुधारणांवरुन वाद नको, पण व्यवस्था कमकुवत होऊ नये- शरद पवार

शिवसेना सगळं बटण दाबून करते- नारायण राणे

धक्कादायक…! सुशांतसिंग राजपूतच्या भावाला भर चौकात गोळ्या घातल्या!

शेतकऱ्यांनो, मी तुमच्यापासून फक्त एक कॉल दूर- नरेंद्र मोदी

संजय राऊत सिंघू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याच्या तयारीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या