महाराष्ट्र मुंबई

कोरोनावर मुख्यमंत्र्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार

मुंबई | कोरोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांचा कोरोनावर इतका अभ्यास झाला आहे की करोना त्यांना झालाच नाही आम्हाला सगळ्यांना झाला, असं अजित पवार यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

पुढची चार वर्षे महाविकास आघाडी सरकार हे यशस्वी आणि दमदार वाटचाल करेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही. आपण एकजुटीने काम करतो आहोत यापुढेही आपल्याला असंच काम करायचं आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खूप चांगली वाटचाल करत आहेत. आपलं सरकार पडणार, तीन महिन्यात कोसळणार, सहा महिन्यात कोसळणार हे विरोधक म्हणत राहिले पण त्यांना हे सरकार पाडण्यात यश आलं नाही, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

प्रियकरानं गुपचूप लग्न उरकल्यानं प्रेयसी संतापली; रागाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे; शरद पवारांचे स्पष्ट मत

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या