बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संकटाच्या काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत- अजित पवार

सातारा | पीएम केअरकडून आलेले अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण असे व्हेंटिलेटर दुरुस्त करुन घ्यावे लागत आहेत. अशा काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि सातारा जिल्ह्याचा दौरा केलाय. यावेळी नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरुन अजित पवार चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. राज्यात आता रेमडेसिव्हीरचा तुटवडा राहिला नाही. पण म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन कमी पडत आहे. तसंच रुग्णालयातील ऑक्सिजन, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटच्या सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

आपण फक्त परिस्थितीचा आढावा घेतला नाही तर मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. जिथे कर्मचारी कमी आहेत, तिथे कर्मचारी दिले. 7 रुग्णवाहिका उद्या साताऱ्यासाठी येतील. लसीकरणासाठी दादागिरीच्या तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत पोलिसांना कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशा शब्दात अजितदादांनी दादागिरी करणाऱ्यांना इशारा दिलाय.

साताऱ्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी प्रशासनाकडून काही कठोर पावलं उचलली जातील. त्यामुळे सातारकरांनी वाईट वाटून घेऊ नये. कारवाईची वेळ नागरिकांनी आणू नये, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधानांना देण्यात आलेली वागणूक योग्य नाही- राजनाथ सिंग

मोदींना ममता बॅनर्जींनी अर्धा तास वाट पाहायला लावली; नुकसानीचा अहवाल दिला अन्…

GST परिषदेच्या बैठकीत मोठा निर्णय! 31 ऑगस्टपर्यंत या वस्तूंवर आयात शुल्क माफ

DNB मेडिसीन परीक्षेत औरंगाबादमधील विद्यार्थ्याचं दैदीप्यमान यश!

कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या डाॅक्टर्सला व्हिडीओच्या माध्यमातून ‘मनापासून साॅरी’, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More