“मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता”
पुणे | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे माजी खासदार विजय शिवतारे यांना जोरदार टोला लगावला आहे. तुम्हालाही माहिती आहे ना बाबा मीच सांगितलं होतं की पुढच्यावेळी कसा निवडून येतो तेच बघतो. अन चॅलेंज काय, मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही आणि काय पाडलं म्हणता, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना नियमांबाबत महत्वाची माहिती दिली. यावेळी ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीला देशपातळीवरील तीनही पक्षाचे नेते निर्णय घेतील आणि तो निर्णय सर्वांना मान्य असेल, असंही अजित पवार म्हणाले. त्यावेळी शिवसेनेचे माजी खासदार विजय शिवतारे हे लोकसभेला आघाडीसाठी अनुकूल नाहीत, असं पत्रकारांनी विचारलं. त्यावर पुन्हा एकदा अजित पवार यांनी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेत ते जे ठरवतील तेच होणार, असं स्पष्ट केलंय.
दरम्यान, अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिलीय. सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
थोडक्यात बातम्या-
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज पहिल्यांदाच आली समोर, पाहा व्हिडीओ
‘जे कोरोना लस घेतील त्यांना फ्रीमध्ये…’; पॉर्नस्टारने दिलेल्या ऑफरने खळबळ
काँग्रेसची दुखणी साध्या उपायांनी बरी होणार नाहीत- प्रशांत किशोर
अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ
“दोषींवर कारवाई होईपर्यंत मी जागेवरून हालणार नाही”
Comments are closed.