बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या”

पुणे | एक मार्चपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही लस दिली जात आहे. मात्र पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार करणार असल्याचं कळतंय.

पुणे जिल्ह्यातील भाजप खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव सादर करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

पुण्यासह वेगवेगळ्या राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे धोरणात्मक बदल आवश्यक आहे. 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी तात्काळ लसीकरण उपक्रम सुरु करण्यात यावा. त्यासाठी संबंधित राज्यांना अधिकाधिक लसी उपलब्ध करुन द्याव्यात, असं अजित पवार म्हणालेत.

दरम्यान, पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. तसेच पुण्यातील शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन

‘आता जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीये’; सचिन वाझेंच्या व्हाॅट्सअॅप स्टेटसने खळबळ

‘डोकी फुटली तर रडत दिल्लीत जाऊ नका’;संजय राऊतांचा कानडींना इशारा

…अन् लग्नानंतर उलगडलं 25 वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य; वाचा संपूर्ण प्रकार

‘…म्हणून मला ऐश्वर्याचा राग येतो’; श्वेता बच्चनने सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More