बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका- अजित पवार

पुणे | पुण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. यावेळी इमारतीचं महिन्याचं भाडं 12 लाख रूपये असल्याने अजित पवारांनी आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली.

‘झोपु’चे कार्यालय जास्त काळ राहू देणार नाही. महिन्याला 12 लाख रूपये म्हणजे वर्षाला दीड कोटी रूपये याचं भाडं सरकारला द्याव लागणार आहे. एवढ्या किमतीत स्वत:च कार्यालय तयार होईल. त्यामुळे उगाच जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका, असं अजित पवारांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी आपल्या भाषणात या कार्यालयाचे तोंडभरून कौतूक केलं. त्यानंतर मात्र अजित पवारांनी आपल्या भाषणात इमारतीच्या भाड्यावरून पवारांनी जाहिरपणे आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, आपल्या अजित पवारांच्या फटकेबाजीने कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. जितेंद्र आव्हाडांनी आपल्या भाषणात अजित पवारांची जरा गंमत केली पण अजित पवारांनी त्यांच्या भाषणात गंमतीची व्याजासकट परतफेड केली.

 

ट्रेंडिंग बातम्या-

महामोर्चाआधी मनसेला गुड न्युज; या दोन नेत्यांनी केला ‘मनसे’ प्रवेश!

“दाखवतो हर्षवर्धनचा ड‌ॅशिंग रूबाब… आता चंद्रकांत खैरे खासदार होणार नाही”

महत्वाच्या बातम्या-

“मी महाराष्ट्राची मुलगी; घाबरणार नाही, गप्प बसणार नाही”

ठाकरे सरकारच्या कर्जमाफीचा फायदा गावातील 5 लोकांनाही मिळत नाही- राजू शेट्टी

माझं अंतर्मन सांगतंय की दिल्ली भाजपच जिंकणार- मनोज तिवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More