Top News पुणे महाराष्ट्र

“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”

पुणे | ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात आपण अत्यंत वाईट हरलो याचं प्रत्येक भारतीयाला दु:ख झालं. मात्र हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने दाखवून दिलं असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रहाणेचं कौतुक केलं.

पिंपरी-चिंचवडमध्ये माजी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनावेळी अजित पवार बोलत होते. महाराष्ट्रात, पिंपरी-चिंचवड शहरात खेळाडू घडावेत आणि त्यांनी महाराष्ट्राच, देशाचं प्रतिनिधित्व करावं, असं पवार म्हणाले.

आयपीएलमधून देखील नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आहे. काही जणांनी क्रिकेटला स्वतःचं करिअर केलं. यामध्ये धोनी, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवि शास्त्री यांची उदाहरणं असल्याचं पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानावरही भाष्य केलं.

दरम्यान, क्रिकेट हा खेळ सर्वांना आपलासा वाटतो. क्रिकेट या खेळाला  आगळं-वेगळं महत्व प्राप्त करून देण्याचं काम शरद पवारांनी केलं असल्याचंही शरद पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार’; शरद पवारांची रोखठोक भूमिका

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत”

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल!

“दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या