नाशिक | औरंगाबादच्या नामंतरावरून ठाकरे सरकारमध्ये विरोधाभास असल्याचं चित्र दिसत आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र काँग्रेसने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबादच्या नामांतरावरुन निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावं यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत. आघाडीतील तिनही पक्ष महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आले असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही समान कार्यक्रम आखलेला आहे. तो कार्यक्रम राबवत असताना त्यामध्ये कधीतरी असा प्रसंग येतो आणि त्यातून आम्ही समोपचाराने मार्ग काढू, असंही पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“औरंगाबादच्या नामांतराच्या वादातून ठाकरे सरकार कोसळणार”
‘मी ‘त्या’ पैशातून तीन कोटी 75 लाखांचं नवीन कार्यालय विकत घेतलं’; मातोंडकरांनी केला खुलासा
“ओबीसीला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या”
“मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?”
‘पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा’; संभाजी ब्रिगेडची मागणी