Top News महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही साधला राज्यपालांवर निशाणा; म्हणाले…

मुंबई | केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीत गेले 60 दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर दाखल झाला आहे. राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळ भेट न घेण्यावरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टीका केली होती. यावरूनच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही टीका केली आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे राज्यपाल शकणार नसल्याची माहिती मला समजली. मात्र  मात्र अशावेळी इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी कार्यक्रम थोडा बदलायचा होता. कोणाला प्राधान्य द्यायचे हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवांरानी काल राज्यपालांवर टीका केली होती.

महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असं म्हणत शरद पवारांनी कोश्यारींवर टीका केली होती.

दरम्यान, गोवा राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे आहे. 25 जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्यामुळे ते त्यादिवशी राज्यपाल शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नसल्याचं राजभवनाकडून अगोदर स्पष्टीकरण दिलं असल्याचं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पुरस्कार- संजय राऊत

अनाथांच्या मातेला ‘पद्मश्री’; सिंधुताईंच्या ‘या’ भाषणानं साऱ्यांच्याच डोळ्यात अश्रू

प्रजासत्ताकदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहिदांना आदरांजली

“शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली”

ट्रॅक्टर परेडमधील शेतकऱ्याला स्टंटबाजी करणं पडलं महागात; पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या