बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आपणच नियम करायचे आणि आपणच मोडायचे हे आमच्या रक्तात नाही”

पुणे |  सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार बैलगाडा शर्यतींना बंदी आहे. राज्यात बैलगाडा शर्यतींवरील बंदी हटवण्याची मागणी विरोधी पक्षाने लावून धरली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नियमांचं उल्लंघन करत सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. अशातच  यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

आता काही जण बैलगाडा शर्यतीवरून स्टंटबाजी करत आहेत. मागील पाच वर्षाच्या काळात त्यांचंच सरकार होतं आणि केंद्रात देखील त्यांचीच सत्ता होती. कोणी त्यांना अडवलं नव्हतं. निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकार काही करत नाही असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न काहींचा सुरू आहे. कायदा तोडून कोणी स्पर्धा भरवत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होणार. आम्हाला सुद्धा स्पर्धा घेता येतात. मात्र आपणच नियम करायचे आणि आपणच तोडायचे हे आमच्या रक्तात नसल्याचं म्हणच पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शर्यत ही सुरू व्हावी अशी आमचीही इच्छा आहे मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे परवानगी देता येत नाही. बैल हा पाळीव प्राणी म्हणून न गणता वन्यप्राणी म्हणून गणला गेला. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

कौतुकास्पद! तरुणीने अपंगत्वावर मात करुन केला डान्स, पाहा व्हिडीओ

काय सांगता! कपाशीच्या पिकाला चक्क काकडी?, पाहा व्हिडीओ

गाडीत पाण्याची बाटली ठेवणं बेतलं जीवावर, पाहा व्हिडीओ

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी बैठकीत नेमकं काय झालं?; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

“बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More