पुणे | भाजप खासदार गिरीष बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा असल्याचं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बापटांना अनेक कोपखळ्या मारल्या. पुण्यातील ‘प्रबोधन’चा शतकोत्सव या कार्यक्रमात गिरीष बापट, अजित पवार आणि नीलम गोऱ्हे एकाच मंचावर उपस्थित होते.
गिरीष बापट यांचा काँग्रेससारखा आहे. त्यामुळेच त्यांचे सर्व पक्षांत संबंध असल्यानं ते आमदार, खासदार म्हणून निवडून येत असल्याचं, असल्याचं पवार म्हणाले.
नीलम गोऱ्हे यांनी गिरीश बापटांचा उल्लेख हा भाजपचे खासदार असा केला. पण बापट एका पक्षाचे नाहीत तर ते पुण्याचे खासदार आहेत. राजकीय पक्ष तिकीट देतो म्हणून त्या त्या पक्षाचे खासदार किंवा आमदार पण काही मतदारसंघाचे असतात त्याप्रमाणे बापट हे पुण्याचे खासदार असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आपल्या इथं काही लोकांची शॉर्ट मेमरी असते. ते ताजी-ताजी गोष्ट लक्षात ठेवतात, मात्र नंतर त्याचे परिणाम दिसतात. प्रबोधनकार यांनी ठाकरे शैली निर्माण केली. निर्भीड, परखडपणे बोलण्यासाठी ठाकरे शैली समोर आली असल्याचं पवारांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं- अजित पवार
“दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही”
‘सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार’; शरद पवारांची रोखठोक भूमिका
दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत”