बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रवादीने दगड मारला कशावरून, कुणी जर स्वत:च गाडीवर दगड मारून घेत असेल तर काय बोलायचं?”

पुणे | भाजपचे नेते आणि विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीची चर्चा राज्यभर होती. गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आरोप केले त्यामुळे त्यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचं बोललं जात आहे. अशातच या हल्ल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कुणी जर स्वत:च गाडीवर दगड मारून घेत असेल तर काय बोलायचं?, असं म्हणत अजित पवारांनी गोपीचंद पडळरांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. दगड मारणारा तरूण जो दिसत आहे त्याचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबतचा फोटो पडळकरांनी आपल्या ट्विटवर ट्विट केला आहे.

कार्यकर्त्याचं नाव काय आहे?, मीही फोटो बघितला. गाडीची काच फुटलेली. तो राष्ट्रवादीनेच मारला कशावरून? ते आमचे विरोधकच आहे. ते दुसऱ्या कुणाचं नाव घेणार?, ते भाजपचं नाव तर घेऊ शकतच नाही. कुणी स्वत:च कट रचून आपल्या गाडीवर दगड मारून घेतला असेल तर काय सांगता येतं असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, पडळकरांवर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे राष्ट्रवादी वि. गोपीचंद पडळकर असा संघर्ष निर्माण झाला आहे. भाजपच्या नेत्यांनीही पडळकरांची पाठराखण केली.

थोडक्यात बातम्या-

पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा पुण्याची आजची आकडेवारी!

“आरक्षण संपुष्टात आणणं हा भाजप आणि संघाचा डाव”

“पाण्याविना मासा तडफडतो तसा भाजप सत्तेविना तडफडत आहे”

“देवाच्या काठीला आवाज नसतो शंभर अपराध भरले की फटका बसतोच, पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला”

“स्वच्छ चारित्र्याच्या चंद्रकांत पाटलांच्या पत्रानंतर जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाली, ही कारवाई राजकीय हेतूने आहे”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More