बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जयंत पाटील हे तर…’; पाटलांच्या नाराजीवर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले….

पुणे | ठाकरे सरकारमधील राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यातील वादावर राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून जयंत पाटलांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर नाराजी जाहीर केली होती. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

राज्यातील प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. कोणताही वाद असण्याचं कारण नाही. जयंत पाटील हे अतिशय शांत स्वभावाचे आहेत. उलट मी त्यांच्यापेक्षा तापड स्वभावाचा आहे. अधिकाऱ्यांसोबत काही मतभेद असतील तर ते बैठक घेऊन समोरासमोर सोडवले जातील आणि योग्य त्या सूचना करण्यात येतील, असं अजित पवार म्हणाले.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील करोना परिस्थितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत करोना उपाययोजना आणि लसीकरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, जयंत पाटील खूप वरिष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी राज्याचं अर्थ मंत्रालय सांभाळलं. गृह मंत्रालय सांभाळलं. ग्रामविकास मंत्रालय सांभाळलं. आता ते जलसंपदा मंत्रालय सांभाळतात. त्यांच्या कामाची पद्धत बघितली, तर ते अतिशय शांत स्वभावाचे आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेणारे असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का? अमोल कोल्हेंचं कवितेतून परखड भाष्य

मास्क नको, सोशल डिस्टन्सिंगही पाळू नका, लस घेतलेल्या नागरिकांसाठी ‘या’ देशाच्या नव्या सूचना!

सर्वात प्रभावी Sputnik V लशीची किंमत जाहीर, इतक्या रुपयांना मिळणार!

“मामाचा फोन घेतला नाही, कॉलबॅक राहिला अन्…”; पुष्कर जोगला रडू आवरेना

‘लव यू जिंदगी’ म्हणत ती धैर्यानं कोरोनाशी लढली, मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More