बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेने जीवनात यशस्वी कसं व्हावं याचं मीरा आदर्श उदाहरण”

मुंबई | टोकियो आलिम्पिकला सुरूवात झाली असून भारताने पदकांचं खातं उघडलं आहे. भारताची महिला वेट लिफ्टर मीराबाई चानूने रौप्य पदक मिळवत भारतासाठी पहिलं पदक पटकावलं आहे. देशभरातून तिच कौतुक होत आहे. अशातच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही मीराबाई चानूचं कौतुक केलं आहे.

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोमध्ये जिंकलेलं पदक हे अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेनं जीवनात कसं यशस्वी व्हावं, याचं आदर्श उदाहरण आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं मनःपूर्वक अभिनंदन! पहिल्याच दिवशी मिळालेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूना उत्तम कामगिरी करून पदक जिंकण्यास प्रेरणा,विश्वास देईल, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मीराबाई चानूने स्नैचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्क 115 किलो असे मिळून एकूण 202 किलो वजन उचललं. तर चीनच्या झू लिजुनने एकूण 210 किलो वजन उचललं. त्यामुळे चीनला सुवर्णपदक तर भारताला रौप्यपदक मिळालं आहे. हे पदक जिंकताच तिने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

थोडक्यात बातम्या

पाऊस उसंत देणार का?, 5 दिवसांसाठी हवामान विभागाचा नवा अंदाज

पुणेकरांना मोठा दिलासा, ‘या’ नियमाबाबत अजित पवारांचे मोठे संकेत

उद्धव ठाकरे हॅलिकॉप्टरने तळीये गावात दाखल

पूर आणि दरडग्रस्तांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सरकारला ‘ही’ महत्त्वाची मागणी

रायगडमध्ये दुर्घटनांची मालिका सुरुच; हिरकणीवाडीत दरड कोसळली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More