बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिपळूण दौऱ्यावेळी अधिकाऱ्यांना झापत, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राणेंना अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुंबई | मुसळधार पावसामुळे राज्यातील कोकण विभागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले तर दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मालाचंही नुकसान झालं आहे. यानंतर राज्यातील नेते पूरस्थिती भागाची पाहणी करण्यासाठी दौरा करताना दिसत आहेत. मात्र दौऱ्यावरून राजकारण तापताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रत्नागिरीमधील चिपळूण दौऱ्यावेळी अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनीअधिकाऱ्यांना फैलावर घेतलं होतं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंना उत्तर दिलं आहे.

मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे. पण आपल्यासोबत अधिकारी असले पाहिजेत अशी अपेक्षा करु नये, असं म्हणत अजित पवार यांनी राणेंचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्हीही विरोधात असताना दौरे केले होते पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठं आहे, तहसीलदार कुठं आहे, प्रांत कुठे आहे, याची विचारणा करत बसलो नाही. मात्र काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तुम्ही त्यांना पाहायला आहात की पाहणी करण्यासाठी?, जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकत असल्याचं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

भाजप-मनसे एकत्र येणार का?; राज ठाकरे म्हणतात…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयची मोठी कारवाई!

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची संधी अनेकदा हुकली – देवेंद्र फडणवीस

काश्मीरमधील ‘त्या’ शाळेसाठी अक्षय कुमारनं दिली आर्थिक मदत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More