Top News पुणे महाराष्ट्र

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही उगाच कशाला नाव घेऊन त्यांना मोठं करायचं”

पुणे | भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते.

अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही आणि ते कधी होणार नाहीत. पण कसंतरी उपमुख्यमंत्रिपद मिळालं होतं पण आता दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली असल्याचं निलेश राणेंनी म्हटलं होतं.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, दोन उपमुख्यमंत्रिपद असण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना समसमान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे फॉर्मुला आधीच ठरलेला आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.

थोडक्याता बातम्या- 

‘सचिन तेंडुलकर भाजप सरकारचा दलाल’; संभाज ब्रिगेड आक्रमक

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शेतकरी आंदोनावर सलमान खाननं सोडलं मौन; म्हणाला…

पाॅपस्टार रिहानाबद्दल भारतीय लोक इंटरनेटवर शोधत आहेत ‘ही’ धक्कादायक गोष्ट

रात्री गावी जाण्याची सोय नव्हती; तरुणांनी केलेल्या प्रकारानं एसटी महामंडळाची झोप उडाली!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या