मुंबई | माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याला संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं म्हणत भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदेंना धमकी दिली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकारणात कोणी कोणाला धमकी देण्यात काही अर्थ नसतो. कदाचित कार्यकर्त्यांना बरं वाटावं, ते आपल्यासोबत रहावेत यासाठी कोणीतरी काहीतरी बोललं जातं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मला त्या धमकीबद्दल काही माहित नाही मात्र त्या धमकीला घाबरण्याचं कारण नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मुंबईत ते माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना पवारांनी पेट्रोल-डीझेलच्या दरावरून फडणवीसांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं
दरम्यान, केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत त्याचं समर्थन करता येत नाही म्हणून अशा प्रकारची वक्तव्य करत केली जात असल्याचं अजित पवार म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
ठाकरे सरकारने पंकजा मुंडेंचं ‘ते’ धोरण ठेवलं कायम
“अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे”
‘राकेश टिकैत हे 2000 रुपयांसाठी कुठेही जायला तयार’; भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
“…तुम्ही पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवा, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नका”
“बारामती अॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा मग गाझीपूरला जावा”