बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून अजितदादा मुनगंटीवारांना म्हणाले, ‘चुकीला माफी नाही’!

मुंबई | ‘हो आम्ही शिवसेनेला फसवलं, आमची चूक झाली’, असं भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केलं. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपला चांगलेच चिमटे काढले.

सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली पण आता चुकीला माफी नाही, असं म्हणत पवारांनी बाजूला बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अजित पवारांनी कटाक्ष टाकला. त्यावर मानेने नकार देत उद्धव ठाकरेंनीही चुकीला माफी नसल्याचं म्हटलं. पवारांनी असं म्हणताच विधानसभेत हास्याचे कारंजे उडले.

आपलं सरकार होणार आहे होणार आहे.. असंच तुम्हाला पाच वर्ष म्हणावं लागेल. तुम्ही नाही म्हणालात तर पाठी बसलेले आमदार उठतील आणि निघून जातील, असा टोलाही अजित पवारांनी यावेळी बोलताना लगावला.

दरम्यान, इकडे ज्योतिरादित्य सिंधीया होणार नाही, तिकडे होणार नाही याची काळजी घ्या, असा उपरोधक सल्लाही अजित पवारांनी भाजपला दिला. मी जे करायचं ते लपून करत नाही, आता मी इथे मजबूत बसलोय, असं म्हणत पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

ट्रेंडिंग बातम्या-

शरद पवारांच्या पत्रानंतर केंद्र सरकार नमलं; फारूक अब्दुलांची नदरकैद मागे

राज्यसभा उमेदवारीत डावलल्यानंतर चंद्रकांत खैरे ‘नॉट रिचेबल’

महत्वाच्या बातम्या

शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सर्वात मोठी घोषणा

Googleच्याही मुळावर कोरोना, भारतातील ऑफिस बंद!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More