बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे…’; उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर अजित पवांराची प्रतिक्रिया

पुणे | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. यावर राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अशातच यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी काय बोलावं मी कसं ठरवणार?, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे मी काय सांगू, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावेळी मंचावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व भागवत कराड, सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार इम्तियाज जलील आणि इ. नेते उपस्थित होते.

दरम्यान,औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. मात्र त्यांच्या या चर्चेमुळे युती-भाजप पु्न्हा होणार अशा चर्चांणा उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल तर…- छगन भुजबळ

…अन् पुण्यातल्या पठ्ठ्यानं उभारलं चक्क गाडीचं स्मारक, पाहा व्हिडीओ!

संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय”

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ!

रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More