बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजपची मक्तेदारी आहे का?, अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नाही’; अजित पवार आक्रमक

मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. मात्र अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेेचच टीका केली. हा राज्याचा अर्थसंकल्प आहे की मुंबई महानगरपालिकेचा?, असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी काय आज अर्थसंकल्प मांडत नाही. 2009 ते 14 पर्यंत मी 4 अर्थसंकल्प मांडले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनीही मांडले आहेत. अर्थसंकल्प मांडणं हे आमच्यासाठी नवीन नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

राज्याला टॅक्समधून येणारा पैसा कमी झाला आहे. केंद्राकडून अजूनही 32 हजार कोटी आलेले नाहीत. आम्ही आमच्या बाजूने सर्व घटकांना बरोबर घेऊन अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यावेळी आमच्या सगळ्यांच्या समोर हे आव्हान होतं. शून्य टक्के व्याजाची घोषणा भाजपची नाही. भाजपची काय मक्तेदारी आहे का?, आम्हाला काही कळतच नाही का? त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आम्ही काय साधूसंत नाही, अशी तिखट शब्दात अजित पवारांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, जनतेला सरकारबद्दल आपलेपणाची भूमिका वाटावी, हे आमचं काम आहे. आम्ही असा कार्यक्रम देणार जो जनतेला आवडला पाहिजे. पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेनं आमचा विचार केला पाहिजे. नांदेड, पुणे, ग्रामीण भागातल्या रस्त्यांचा कार्यक्रम हे मुंबई महापालिकेत आहे का?, मुंबई ही देशाची राजधानी आहे. तिच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘हे महाराष्ट्राच बजेट की मुंबई महापालिकेचं’; अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

अखेर अमृता फडणवीसांच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा व्हिडीओ

कारखान्यात 500 लोकं चालतात, लग्नात 100 लोकंही नाही; कोरोनाशी अधिकाऱ्यांची सेटिंग?

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्वाच्या दहा घोषणा, जाणून घ्या!

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात पुण्यातील रिंग रोडबाबत मोठी घोषणा?, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More