बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे – अजित पवार

मुंबई | आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहे. 2020 च्या अर्थसंकल्पासमोर आव्हानांचा डोंगर आहे. यावर केंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आज जाहीर होणाऱ्या बजेटकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. देश अनेक नियमांनी ग्रासलाय. बाजारात मंदी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे बजेट केंद्राने द्यावं, अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली आहे.

बेरोजगारी, महागाई, उद्योग यासाठी काय पावलं उचलली आहे ते बघणार आहोत. त्यानंतर राज्याला मिळणाऱ्या निधीचं नियोजन करून राज्याचं बजेट सादर करणार आहोत, असंही पवारांंनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर करताना गोपाळ कृष्ण, डॉ. सय्यद जफर इस्लाम, नरेंद्र तनेजा आणि अमित मालवीय या तज्ञांचा सल्ला घेतला असल्याची माहिती समजत आहे

ट्रेंडिंग बातम्या- 

भाजपनं सुरु केलेल्या योजना बंद करु नका; रावसाहेब दानवेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये रंगला बॅडमिंटन सामना; विखेंचीही उपस्थिती

महत्वाच्या बातम्या- 

अरबी समुद्रातील शिवस्मारक योजना रद्द करण्यासाठी याचिका दाखल

कामाला जा पैसे कमवून आण…, 75 वर्षीय वृद्ध आईला मुलांनी घरातून हाकललं

“साध्वी प्रज्ञा मूर्ख, आमचं दुर्दैव की त्या आमच्या पक्षात आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More