‘आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाहीत’; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं
मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरूवारी सुरूवात झाली. अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशीही भाजपने सरकारला घेरण्याचं काम केलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेत चांगलाच गोंधळ घातला.
गेल्या वेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येत ओबीसी आरक्षणाबाबतचा प्रस्ताव आणला होता.पण कायदेशीर बाबीत अडचणी येत असतात. मात्र, कुणी मुद्दामुन यात दबाव आणत आहे का, असा आरोप विरोधकांनी केला. याबद्दल बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच खडसावलं आहे.
ओबीसी आरक्षणात कोणी मुद्दामुन दबाव आणत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाहीत. आमच्यावर कुणाचा दबाव नाही, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना खडसावलं. तर ओबीसी आरक्षण हा भावनिक मुद्दा झाला असल्याचंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या समस्येतून तोडगा निघावा यासाठी बैठका होत आहेत. सोमवारी येणारं विधेयक आपण एकमताने मंजूर करूया, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. तर ओबीसी समाज निवडणुकीतून वंचित राहणार नाही, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला आहे.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाची चौथी लाट येणार?; ICMR च्या वक्तव्याने सर्वांचं टेंशन वाढलं
‘ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून भुजबळांवर कोणाचा दबाव आहे का?’; फडणवीसांचा हल्लाबोल
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या
“प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो, महाराष्ट्रात ‘भाजपाल’ आहे”
मोठी बातमी! युक्रेनमधून निघालेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली
Comments are closed.